1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 मे 2024 (18:33 IST)

लग्नात झुंबर पडल्याने पंचतारांकित हॉटेलला 2.70 लाखांचा दंड

Five star hotel
मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये एका जोडप्याने लग्नाची पार्टी आयोजित केली होती. पार्टीच्या दिवशी सभागृहातील झुंबर तुटून जमिनीवर पडून अपघात झाला.या अपघातात वधूचा भाऊ जखमी झाला असून वधू पक्षाने हॉटेलच्या विरोधात ग्राहक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर आयोगाने मॅरियट हॉटेलला निकृष्ट सेवा दिल्याबद्दल ग्राहकाला 2 लाख 70 हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले. 
 
वृत्तानुसार, मुंबईतील सहार येथील प्रसिद्ध जेडब्ल्यू मेरियट या पंचतारांकित हॉटेलला ग्राहक आयोगाच्या निर्देशानुसार एका व्यक्तीला 2 लाख 70 हजार रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. 

पश्चिम दादर येथील रहिवासी किंबर्ली डायस यांच्या तक्रारीवरून सुनावणी देत ग्राहक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले होते की, 'ऑक्टोबर 2021 मध्ये, माझ्या मंगेतराने JW मॅरियटशी संपर्क साधला आणि 2 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या आमच्या लग्न समारंभासाठी त्याची ग्रँड बॉलरूम बुक केली.आम्ही मॅरियटला 7,25,847रुपये दिले होते, त्याचे बिल आमच्याकडे आहे. 

लग्नाच्या दिवशी अपघात घडला येथे मोठे झुंबर तुटून खाली पडले. या मध्ये सुदैवाने सर्व पाहुणे सुखरूप बचावले मात्र माझा भाऊ जखमी झाला. तसेच पाहुण्यांसाठी बुक केलेल्या रूमची अवस्था वाईट होती. हॉटेल कडून आम्हाला योग्य व्यवस्था मिळाली नाही. सर्व व्यवस्था नीट करण्यासाठी माझ्या पतीला चर्च मधून लग्न उरकून हॉटेलला जावे लागले. 

महिलेने हे सर्व मुद्दे समोर मांडल्यावर मेरियटने 17 जानेवारी त्यांना 1 लाख रुपये परत करण्याचे ऑफर देत ईमेल केले मात्र महिलेने हॉटेल ला कायदेशीर नोटीस पाठवून भरलेली सर्व रक्कम परत करण्याची मागणी केली. या बाबत त्यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार केली. ग्राहक आयोगाने हॉटेलला नोटीस बजावली.त्यावरून हॉटेल कडून कोणतेही उत्तरआले नाही या वरून ग्राहक आयोगाने निष्कर्ष काढत तक्रारदार किम्बर्ली डायस योग्य नुकसान भरपाई मिळण्याचा  पात्र असून जे डब्ल्यू मेरियटला पैसे भरून निकृष्ट सेवा दिल्याबाबद्दल नुकसान भरपाई म्हणून 2.7 लाख  रुपये देण्याचे निर्देश दिले. 
 
Edited by - Priya Dixit