मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 सप्टेंबर 2021 (14:31 IST)

नदीत अंघोळीसाठी गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू

नागपूर- एक धक्कादायक माहिती समोर येत आहे ज्यात अंघोळीसाठी कन्हान नदीत उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे.  हे पाचही तरुण यवतमाळमधील दिग्रस येथील बाराभाई मोहल्ला येथील रहिवाशी आहेत.
 
यवतमाळ मधील दिग्रसमध्ये राहणाऱ्या 12 तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी गेले असताना सकाळाच्या सुमारास हे सर्व तरुण अंघोळीसाठी नदी पात्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील 5 युवक बुडाले आहे. या तरुणांचे मृतदेह अद्याप हाती आले नसून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
 
तसेच स्थानिक पथकाने एसडीआरएफ पथकाची मागणी केलीआहे. नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य करण्यास अडचण येत असल्याचे कळतेय. यामुळे पारशिवणी येथील तहसीलदारांनी एसडीआरएफ नागपूरचे पथक पाठवावे आशी मागणी केली आहे.
 
मृत तरुणांची सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत.  या संपूर्ण घटनेमुळे स्थानिकांमध्ये दुखाचे वातापरण निर्माण झाले आहे.
 
बुडालेल्या पाच तरुणांचे वय 18 ते 22 वर्ष वयोगाटातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक दाखल झाले असून पाचही जणांचा शोध सुरू आहे मात्र अद्याप मृतदेह हाती न लागल्याने नागपूर एसडीआरएफचे पथक पाठवावे, अशी मागणी करण्यात येत आहे.