शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :धुळे , मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (15:50 IST)

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बर्‍याच पोलिसांना विषबाधा

शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला असून त्यांनी प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच त्या विद्यार्थ्यांना लगेचच रुग्णवाहिकेद्वारे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
 
कुणालाही अधिक त्रास झालेला दिसून आला नाही अशी माहिती पोलीस अधिक्षक प्रविणकुार पाटील यांनी दिली. नव्याने पोलीस दलात येणार्‍या पोलीस विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. येथे त्यांच्या निवासासह जेवणाची सोयदेखील याच ठिकाणी केली जाते. काली रात्रीच्या जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कुणाला काही त्रास जाणवला नाही पण, थोड्याच वेळात एका पाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. ही बाब गांभीर्याने घेत त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.