बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (09:01 IST)

पाच वर्ष मीच मुख्यमंत्री : फिफ्टी-फिफ्टी असा कोणताही फॉर्मुला ठरला नाही : देवेंद्र फडवणीस

पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असून शिवसेनेशी फिफ्टी-फिफ्टी असा कोणताही  फॉर्मुला ठरला नाही असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी औपचारिक गप्पा करतांना पत्रकारांशी शेअर केले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘पुढील 5 वर्ष आमचं सरकार स्थिर राहील. कोणी काही बोललं तरी चिंता करण्याचं कारण नाही. मी मिळालेल्या जागांवर खुश आहे. आम्ही फर्स्ट मेरिटमध्ये येणार होतो पण आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आम्ही आलो’
 
आमचा ए प्लॅन आहे त्यामुळे बी प्लॅनची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शपथविधी मुहूर्त ठरला नाही. पुढच्या आठवड्यात शपथविधी असू शकतो. सत्ता स्थापनेबाबत माध्यमांना सरप्राईज देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.पावसात भिजावं लागतं हा आमचा अनुभव कमी पडला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या भाषणावर तिरकस भाष्य केलं. भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार नाहीत. अनधिकृत आणि अधिकृत सेना -भाजप बैठक सुरु आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
 
पुढच्या आठवड्यात शपथविधी होईल असे त्यांनी स्पष्ट केले. आदित्य काय बनतील हे शिवसेना ठरवेल १९९५ चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद असे आश्वासन सेनेला कधीही दिलेले नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट केला.