सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (15:58 IST)

कोकण रेल्वे प्रदूषण मुक्तीकडे, पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी धावली

कोकण रेल्वे मार्गावर इतिहास घडत पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट निघाली. गुरुवारी कोकण रेल्वेवर दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजरला इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले. त्यामुळे प्रदूषणमुक्त पर्व कोकण रेल्वेवर सुरु झाले आहे .

रत्नागिरी ते रोहा दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणीही यशस्वी झाली होती. त्यानंतर मालगाडी विद्युत इंजिनावर धावत होत्या. आता प्रवासी गाडी विद्युत इंजिनावर सुरु करण्यात यश आले आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून कोळसा आणि डिझेलवर धावत होती. तसेच कोकण रेल्वे मार्गावर केवळ डिझेलवर चालणारे इंजिन जोडून एक्सप्रेस चालवल्या जात होत्या. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत होती. काहीवेळा तांत्रिक अडचणी आणि मर्यादा येत होत्या .