मग पहिल्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल : संजय राऊत
मुंबईतील मालाडमधील एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव दिल्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाचं वाद पेटला आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, पहिल्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल,. जर भाजपची ही भाषा असेल ते आम्ही बघू. टिपू सुलतानचं काय करायचं हे सरकार पाहिलं. कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलातानाचा रामनाथ कोविंद यांनी गौरव केला. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक अशा उपाध्या राष्ट्रपती दिल्या. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप राष्ट्रपतींचा राजीनामा मागणार का? हा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पहिल्यांदा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. जर भाजपची ही भाषा असेल ते आम्ही बघू. टिपू सुलतानचं काय करायचं हे सरकार पाहिलं. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही आहात. तुम्ही इतिहास कशाप्रकारे नव्याने लिहिताय, बदलताय. अगदी दिल्लीमध्ये स्वतः इतिहास नव्याने कशा प्रकारे लिहायला घेतलाय, हे आम्हाला माहित आहे, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.