सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (09:07 IST)

माजी आमदार विवेक पाटील यांना २५ जूनपर्यंत कोठडी

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. ईडीने मंगळवारी उशिरा विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराचीदेखील झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ईडीने  विवेक पाटील यांना कोर्टात हजर केलं असता त्यांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.
 
ईडीने कोर्टात या प्रकरणी केलेल्या तपासात जे खुलासे केले ते धक्कादायक आहे. विवेक पाटील यांनी बोगस अकाउंट बनवून कोट्यवधीचं लोन दिल्याचं दाखवलं. नंतर ते पैसे स्वत:च्या संस्थांच्या अकाउंटमध्ये वळवले, अशी धक्कादायक माहिती ईडीने कोर्टात दिली. त्यामुळे कोर्टाने याप्रकरणी विवेक पाटील यांनी २५ जूनपर्यंत कोठडी सुनावली.