गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (21:02 IST)

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्जप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात खान यांना दिवसभराच्या चौकशीनंतर एनसीबीनं अटक केली होती.
 
वांद्रे पश्चिम येथून तब्बल २०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणावर गांजा एका कुरियरमधून जप्त केल्यानंतर समीर खान यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. एनसीबीनं आज त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेले त्यानंतर कोर्टात हजर केले. दरम्यान, कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
 
यासंदर्भात १४ जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले होते, “कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. कोणत्याही भेदभावाशिवाय तो सर्वांना लागू व्हायला हवा. कायदा त्याच्याप्रमाणे चालेल आणि त्यावर न्यायही मिळेल. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आणि आदर आहे.”