शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (12:21 IST)

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

sanjay pandey
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ईडीने  समन्स बजावले आहे. पांडे यांना ईडी ने ५ जुलै रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेत. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना भाजपकडून त्यांच्यावर आरोप केले जात होते पण ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलं नाही. या समन्समध्ये त्यांना ५ जुलैला ईडी कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.
 
दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचं नाव समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.