रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (12:20 IST)

'आरे’चा विरोध प्रायोजित : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने  वेंद्र फडणवणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले “आज विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ऱाहूल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांच्य़ा रुपाने सभागृहला एक तरूण, अभ्यासू विधिज्ञ, लाभला. सबागृहाच्या वतीने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पास झाला. उद्या विधीमंडळात विश्वासताचा प्रस्ताव सभागृहात ठेवणार आहोत. हा ठराव माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली आम्हीच जिंकणार आहोत.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
मेट्रो प्रकल्पावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा आणि काही प्रमाणात प्रायोजित आहे. मी पर्यावरणवाद्यांचा आदर राखतो. मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. या प्रकल्पाच्या संदर्भातले काही निर्णय उशिरा घेतले तर मट्रो प्रकल्प हा नाकापेक्षा मोती जड असा होईल. हा प्रकल्प मुंबईकरांना मिळण्यासाठी आम्ही पर्यावरण पुरक प्रयत्न करणार आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.