रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (07:56 IST)

शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची सक्रीय राजकारणातून निवृत्ती

vivek patil
facebook
Former Shekap MLA Vivek Patil retires from active politics  पनवेल विधान सभेचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी तुरुंगातून पत्र लिहून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. या पत्रातून त्यांनी कार्यकत्यारचे आभार मानले आहे. गेली दोन वर्षे विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याआधी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचा आजार आता बळावला आहे. तुरुंगातून लिहलेल्या पत्रातही त्यांनी आजारपणाचंच कारण दिलं आहे. विवेक पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं समजताच शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
गेली अनेक वर्षे आपण विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बाळाराम पाटील यांनी दिली. ते ‘आरएनओ’शी बोलत होते. विवेक पाटील यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना बाळाराम पाटील म्हणाले, आज सकाळीच मला विवेक पाटील यांच्या पत्राची माहिती मिळाली. त्या पत्रावरील सही निश्चितपणे विवेक पाटील यांचीच आहे. हा निर्णय घेत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षातील सर्व सहकार्यांच पत्राद्वारे आभार व्यक्‍त केले आहेत.