शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (08:51 IST)

भाजपा नगरसेवकाच्या घरच्यांवर जबरदस्त हल्ला चार ठार

धक्का दायक गोष्ट घडली असून, भाजपच्या नगरसेवकावर झालेल्या हल्ल्यात घरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर त्यांच्या निवासस्थानी अज्ञातांकडून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा जागीच तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हल्लेखोर कोण आहेत, हे मात्र अजून समजू शकलेले नाहीत.अज्ञातांनी केलेल्या बेछुट गोळीबारात खरात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
 
रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाला. या गंभीर प्रकरणी  हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. यात त्यांचे बंधू भाऊ सुनील बाबूराव खरात (५५) व स्वत: रवींद्र बाबूराव खरात (५०), मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) ठार झाले आहेत. गोळीबारानंतर जखमी रवींद्र खरात यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेत त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश याच्यासह अन्य एक असे चार जण गंभीर जखमी आहे.या हल्ल्याने जळगावमधील पोलीस यंत्रणेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्यानेच त्यांची थेट कुटुंबावर गोळीबार करण्याची मजल गेल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप गुन्हेगारांबाबत काहीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.