सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑक्टोबर 2019 (08:48 IST)

नाशिकला पावसाने जोरदार झोडपले, गोदावरीला पूर स्थिती

नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने पुन्हा हजीरी लावल्याने नाशिकार्रांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे धरण पान्लोट क्षेत्रात पौसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरणातून सायंकाळी साडे सहा वाजे नंतर २२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्याच सोबत जिल्ह्यातील इगतपुरी पेठ तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून ५५० क्युसेक पाण्याचा विसर्गग सोडण्यात आला आहे. दरम्यान, गोदा घाट लागत असलेला सराफ बाजार, दहीपूल, गाडगेमहाराज पूल, गणेशवाडी भाजी मंडई व इतर परिसरात पाणी शिरले आहे.
 
रविवारी दुपारी शहरामध्ये सुमारे सव्वा तासात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नवरात्रीनिमित्त शहरात होत असलेले पुजाविधी तसेच सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या आनंदावर यामुळे पाणी फेरले गेले. शहरात दुपारी चार वाजेनंतर पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे रविवार पेठ, मेनरोड, दहीपूल, सराफ बाजार या बाजारपेठांमध्ये तसेच राजीव गांधी भवनासमोर शरणपूर रस्त्यापासून ते गावठाणमधील जुने नाशिक भागातील रस्त्यापर्यंत पाण्याचे पाट वाहत होते. काही ठिकाणी गटारीही उफाळून आल्या होत्या. शहरातील सर्व उपनगरे या भागात जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नासर्डी तसेच गोदावरीची पातळी देखील वाढली. दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहर व परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला, चार वाजता जोरदार तरी अवघ्या सव्वा तासात शहर व परिसरात पावसाने धुमशान केलं. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शहरातील रस्ते पुन्हा गजबजले.
 
दरम्यान, दुपारनंतर सुरु झालेल्या दमदार पावसामुळे जुने नाशकातील अनेक सकल भाग पाण्या खाली गेले. सराफ बाजार, गणेशवाडी भाजी मंडई, रामकुंड व इतर परिसरात पुराचे पाणी शिरले. विशेष म्हणजे दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शहरात विजांचा कडकडाट अँड ढगांच्या गडगडाटासह अवघ्या दोनच तासात ४०.८ मीमी पासची नोंद झाली. पावसामुळे कालिका मातेच्या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या भिविकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसर व जवळच्या  इमारतींना मध्ये शरण घेतली. दरम्यान मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.