1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:45 IST)

इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

Four members of the same family were killed in a head-on collision between an Ertiga and a two-wheeler इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठारMaharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
देवळा – नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर इर्टीगा आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर ता.देवळा येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच तर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने रामेश्वर सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर येथील ढेबुड मळा शिवारातील हिरे कुटुंबातील चार जण पिंपळगाव (वा.) येथून मोटारसायकलने (एमएच ४१ के ५६६१) शेतावर काम करून घराकडे परतत असतांना नाशिककडून आलेल्या इर्टीगा कारने (एमएच ४३ एएल ३००९) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात या हिरे कुटुंबातील गोपीनाथ साळूबा हिरे (वय ४२ ), मंगलबाई गोपीनाथ हिरे (वय ३५) या पती-पत्नीसह मुलगा गोरख गोपीनाथ हिरे (वय १६) हे जागीच ठार झाले तर जागृती गोपीनाथ हिरे ( वय १८) हिचा मालेगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.