मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (14:27 IST)

फेसबुक मित्राने केला घात ;अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आरोपी मित्र गजाआड

Assault by a Facebook friend; rape of a minor girl
मध्यप्रदेशातील बैतुल मध्ये महाराष्ट्रातील नागपूरच्या अल्पवयीन तरुणीवर फेसबुक वर ओळख करून झालेल्या मैत्रीचा फायदा घेत एका तरुणावर एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. बलात्कारानंतर मुलीची प्रकृती खालावली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैतूलच्या मुल्ताई ठाणे हद्दीतील एका १७ वर्षाच्या तरुणाने महाराष्ट्राच्या नागपूर येथील एका तरुणीशी फेसबुक ने मैत्री करून तिला परमंडळ येथे फिरवण्याच्या बहाण्याने बोलावले तिला बैतुल मध्ये आपल्या एका मित्राच्या खंजनपूर येथील घरात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलीची प्रकृती अचानक खालावली. तेव्हा घाबरून तरुणाने मुलीला रुग्णालयात नेले .रुग्णालयाच्या चौकी प्रभारी अधिकाऱ्यांना हे प्रकरण गंभीर वाटले तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी मुलीला जबानी विचारली आणि या मुलीच्या नातेवाईकांना नागपूरहून बोलावले. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे ते मुलीला नागपूरला  घेऊन गेले. मुलीच्या जबानी नंतर मुलीवर बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे . त्याला बाल न्यायालयात पाठविण्यात येणार आहे .