रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (12:12 IST)

एसटी संप चिघळणार; एसटी कर्मचारी राज्यभरातून मुंबईत धडकणार ?

एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरणाची मागणी घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून आंदोलनकारी मुंबईतील आझाद मैदानावर बसले आहे एसटी संपावर अजूनही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानावर येणाचे आवाहन सोशल इडिया वरून केले होते. तसेच येताना  आधार कार्ड, मास्क, कपडे, पे स्लिप आणावी .ही लढा आपल्या कुटुंबियांसाठीची आहे. पुढे या आणि या सरकार कडे मागणी पूर्ण करण्यासाठी लढा. असे आवाहन केल्यामुळे राज्यभरातून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे .