गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (11:10 IST)

स्वाभिमानीचे सोयाबीन कापूस आंदोलन पेटले, आंदोलनाला हिंसक वळण

बुलडाणा येथे गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानीचे आंदोलन सुरु आहे . या आंदोलनाला हिंसक वळण येऊ लागले आहे. संतप्त आंदोलकांनी पोलिसांची गाडी फोडली आणि तहसीलदाराची गाडी पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, रविकांत तुपकांनी आंदोलनासाठी अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलक संतप्त आहे. त्यांनी चिखली- बुलडाणा राज्य महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोडी होऊन प्रशासनाची तारांबळ  झाली. आता या स्वाभिमानी आंदोलनाला वेगळेच वळण आले असून आंदोलन चिघळत आहे.