गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (16:31 IST)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम लागू

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम लागू आहेत. केवळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी लॉकडाऊन कायम राहणार आहे. येथील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना वाढीचा रेट जास्त आहे. त्यामुळे येथे निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
 
'ब्रेक द चेन' अंतर्गत  पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, अहमदनगर, जळगाव, वाशिम सह इतर 13 जिल्ह्यांत  निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जनजीवन सुरळीत सुरू होत आहे, रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत.
 
रत्नागिरी  जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम लागू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकुमार मित्रा यांनी दिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम लागू आहेत. तसा आदेश  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जारी केला आहे.