1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 22 जून 2024 (16:54 IST)

ठाण्यातील एका व्यावसायिकाची 20 लाख रुपयांची फसवणूक,गुन्हा दाखल

सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. ठाण्यातील एका गेम व्यावसायिकाची नवीन मशीनच्या नावावर 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित ने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
सदर प्रकरण नोव्हेंबर 2022 ते 2024 दरम्यानचे ठाण्यातील आहे. एका वृद्ध 69 वर्षीय व्यावसायिकाला गेम झोन मध्ये लहान मुलांसाठी मशीन पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. मुलांच्या खेळण्याच्या जागेसाठी 22 लाख रुपयांच्या मशीनची ऑर्डर दिली होती. आरोपीने 20 लाख रुपये घेऊन नवीन मशीनच्या ऐवजी जुन्या मशिनी पाठवल्या. 

आपली फसवणूक झाल्याचे केल्यावर पीडित व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी गुरुवारी फर्म चालवणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक),आणि 406 (विश्वास भंग) नुसार गुन्हा दाखल केला. 

नौपाडा पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणाले, 'तक्रारदाराने मुलांच्या खेळण्याच्या जागेसाठी 22 लाख रुपयांच्या काही मशिन्सची ऑर्डर दिली होती, परंतु आरोपीने दिलेली सामग्री जुनी होती आणि त्याच्याकडून नवीन मशीनसाठी पैसे वसूल करण्यात आले. पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit