1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2024 (19:53 IST)

नोकरी लावण्याच्या नावाखाली ठाण्यात 6 लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यांत कळवा पोलीस ठाण्यातील एका रहिवाश्याला चार जणांनी तुमच्या मुलाला नौकरी लावून देतो असे सांगत सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मुलाला शिपिंग कंपनीत नौकरी लावून देण्याचं सांगून फसवणूक केली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर प्रकरण ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तिला तुमच्या मुलाला शिपिंग कंपनी मध्ये नौकरी लावून देतो सांगत 6 लाख रुपये मागितले.

नंतर मुलाला नौकरी मिळाली नाही म्हणून पीडित व्यक्तीने पैसे परत मागितले या वर त्यांना 5 लाखाचा चेक देण्यात आला जो बाउंस झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत पीडित व्यक्तीने या प्रकरणी पोलीसात त्यांनी  तक्रार केली. पोलिसांनी चार आरोपीविरूद्ध  कलम 420 (फसवणूक), 406 (गुन्हेगारी विश्वासभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी करत आहे.

Edited by - Priya Dixit