शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (11:53 IST)

ठाणे शहरांत 12 तासांसाठी पाणी बंद

water tap
ठाणे शहरात मुंबई महानगर पाणी पुरवठा विभागाकडून 15 टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. बुधवारी 20 मार्च 2024 रोजी ठाणे शहरात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेतल्यामुळे पाणी पुरवठा 12 तासांसाठी बंद असणार असून शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 30 टक्के कपात होणार आहे. अशामुळे ठाणेकरांवर उन्हाळ्यात पाणी संकट आलं आहे. 

ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बुधवारी जलवाहिनी स्थलांतरित करण्यात येत असल्यामुळे बुधवारी कमी दाबाचे पाणी येणार आहे तर काही भागात बुधवार 20 मार्च सकाळी 9 ते रात्री 9 वाजे पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असून नागरिकांना पाण्याचा योग्य साठा ठेवण्याचं आवाहन ठाणे महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 
 
Edited by - Priya Dixit