बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2024 (12:03 IST)

धक्कादायक! आई-वडिलांनीच केली १८ महिन्यांच्या मुलीची हत्या, दाम्पत्याला अटक

baby
ठाण्यात एका दाम्पत्याने आपल्या 18 महिन्यांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी चिमुकलीचा मृतदेह स्मशानात पुरवला, पोलिसांनी या आरोपी आई वडिलांना अटक केली आहे. जाहिद शेख आणि नुरमी असे या आरोपी आई वडिलांची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दांपत्याने 18 मार्च रोजी मुलीची हत्या केली. पोलिसांना या बाबतचे एक निनावी पत्र मिळाले त्यात लिहिले होते की या दाम्पत्याने आपल्या लेकीचा खून केला आहे आणि मृतदेह गुप्तपणे स्मशानभूमीत पुरला आहे. या पत्रावरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी सहकार्य केले नाही नंतर त्यांची गुन्हा काबुल केला. त्यांनी खून का केला अद्याप कळू शकले नाही. 

या क्रूर आई वडिलांनी आपल्या 18 महिन्यांच्या चिमुकलीला 18 मार्च रोजी संपविले नंतर तिचे मृतदेह स्मशानात पुरून दिले. पोलिसांनी मुलीचे मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठविले असता अहवालात तिच्या शरीरावर आणि डोक्यावर जखमांचे व्रण दिसले. पोलिसांनी आरोपी आईवडिलांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit