ठाणे : 12 वर्षीय दिव्यांग मुलाची 2 भावांकडून हत्या, आरोपींना अटक
ठाणे शहरातील तळोजा परिसरात डायघर येथील ठाकूरपाड्यात राहणाऱ्या दोन भावांनी घराच्या जवळ राहत असलेल्या एका 12 वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी भावांना पोलिसांनी अटक केली आहे. रमझान(20) आणि मोहम्मद(30) असे या आरोपींची नावे आहेत. आरोपी रमझान याने घराच्या जवळ राहणाऱ्या 12 वर्षीय दिव्यांग मुलासोबत अनैतिक कृत्य करण्याच्या उद्धेशाने त्याला निर्जन स्थळी नेलं. आपल्या सोबत काही वाईट घडणार हे केल्यावर मुलाने विरोध केला असता रमझान चिडला आणि तो या घटनेची वाच्यता कुठे करू नाही म्हणूंन त्याच्या डोक्यात दगड घातला मुलाचा मृत्यू झाला आहे की नाही
हे बघण्यासाठी त्याचा गळा आवळून खून केला. मुलाचा मृत्यू झाला आहे की नाही हे समजत नसल्यामुळे त्याने आपल्या भावाला मोहम्मदाला घटनास्थळी बोलावले. नंतर त्यांनी मुलाचे हातपाय बांधले आणि जवळच्या पाण्याच्या डबक्यामध्ये त्याचे प्राण जय पर्यंत बुडवून ठेवलं. मुलाच्या आईने मुलाच्या अपहरण होण्याची तक्रार पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी मुलाचा शोध घेतला.
नन्तर पोलिसांना डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीला लागून असलेल्या तळोजा पोलिसांना डायघर पोलिसांनी दिलेल्या मुलाच्या माहितीनुसार, एक लहान मुलाचा मृतदेह सापडला. हा मृतदेह बेपत्ता झालेल्या मुलाचाआहे हे कळल्यावर पोलिसांनी मुलाच्या घराच्या जवळ राहणाऱ्या काही लोकांची चौकशी केली असता पोलिसांना आरोपी भावांच्या सांगण्यात विसंगती दिसल्यावर त्यांनी आरोपी भावांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून आरोपी दोघा भावांना अटक केली आहे.
Edited By- Priya Dixit