शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (12:16 IST)

तीन विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Clash between three female students in a college in Aurangabad  Maharashtra News In Marathi
औरंगाबाद येथे एका महाविद्यालयात तीन विद्यार्थिनींमध्ये हाणामारी करण्याची घटना घडली आहे. ही  घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत एका तरुणीला दोन तरुणींनी केस धरून बेल्टने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेच्या वेळी महाविद्यालयातील काही पुरुष आणि सुरक्षारक्षक यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणींनी कोणालाही दाद दिली नाही.इतर विद्यार्थिनीं या फ्री स्टाईल हाणामारीच्या बघण्याचा आनंद घेत असून काहींनी याचे व्हिडीओ बनवले. या तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओ मध्ये महाविद्यालयाच्या पार्किंग मध्ये तीन तरुणींच्या हाणामारी करत असताना दिसत आहे. दोघींनी एकत्र येऊन एका तरुणीला लाथाबुक्क्याने मारहाण केली असून त्याचा प्रतिकार तरुणी करताना दिसली. अद्याप कारण समजू शकले नाही. 

Edited By- Priya Dixit