रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (08:15 IST)

गडहिंग्लज पालिका निवडणूक महाविकास आघाडी लढणार : मंत्री हसन मुश्रीफ

hasan mushrif
गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी कर्तव्यनिष्ठ 33 कोटी रुपयांचा निधी पायाभूत सुविधा भक्कम केला आहे. चौफेर विकासासाठी शहराला पुन्हा देशात अव्वल करणार असून येत्या निवडणुकीत गडहिंग्लज पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवून सत्ता मिळणार. पण नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा निर्धार राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना केला.
 
रविवारी गडहिंग्लज शहरातील भीमनगर परिसरात विविध विकास कामाचा लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रा. किसनराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीस युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांनी भीमनगर परिसरातील विविध विकास कामांची माहिती देत आगामी काळात प्रस्तावित कामांची माहिती दिली. गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱयांकडून भीमनगरला विकास निधी दिला नाही. मंत्री मुश्रीफ आणि मागासवर्गीय वस्तीला मोठय़ा प्रमाणात निधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
 
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गडहिंग्लज शहर देशात अव्वल करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामे करण्यासाठी या निवडणुकीत आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत पण नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात महाविकास आघाडीचे चांगले काम असल्याने विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. मंत्री म्हणून काम करत असताना विविध शासकीय योजना विकास कामे न थकता घरातील व्यक्ती पर्यंत पोहोचण्याचा माणूस आहे तुम्ही दिलेल्या संधीचा हमाल म्हणून काम करत असून वंचित घटकांपर्यंत पोचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी जनतादलाचे नाव टाळत तुमचे काम कोणत्या पक्षाकडून होईल याचा विचार करण्याची वेळ आल्याचे सांगितले. शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध असून या निवडणुकीत साथ देण्याचे आवाहन केले. बांधकाम कामगार नोंदणी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरीब वंचित लोकांना शासकीय योजना आणि विविध विकास कामांसाठी गडहिंग्लजकरांचा पाठपुरावा सातत्य होत असल्याने काम करण्यासाठी ताकद मिळत असल्याचे मंत्री मुश्रीफ सांगितले. येथील क्रीडाप्रेमी सह खेळाडूंना अत्याधुनिक मैदान उपलब्ध करून देण्यासाठी नुकताच क्रीडांगणासाठी 50 कोटी निधीची तरतूद केली आहे. शहरात राष्ट्रवादीच्या नगरसेवक, पदाधिकाऱयांच्या कडून शासनाच्या विविध योजना उपक्रम पोहोचणे पर्यंत धडपड सुरू आहे. हे नक्कीच कौतुकास्पद असून येत्या काळात निवडणुकीत निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. नगरपालिकेत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असून शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱयांशी लवकर चर्चा करणार सांगत कार्य करताना कामाला लागण्याचे आदेश दिले.