1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (23:46 IST)

गजानन मारणेचा साथींदार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याला इंदूर मधून अटक

गजानन मारणे यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी मारणे आणि त्यांच्या गटावर 11 ऑक्टोबर रोजी मोक्काची कारवाई केली आहे. या गुन्हयात डॉ. बांदिवडेकर हा देखील सामील होता. बांदिवडेकर हा मूळचा कोल्हापूरचा राहणारा असून त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत पुणे पोलिसांच्या गुन्हे पथकाने गजानन मारणे यांच्या साथीदार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याला मध्यप्रदेशातील इंदूर मधून ताब्यात घेतलं आहे. बांदिवडेकर मूळचा कोल्हापूरचा असून मारणे ह्यांच्या प्रत्येक गुन्ह्यात सामील असे. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांना तो इंदूर मध्ये असल्याची  माहिती मिळाली आणि त्यांनी बांदिवडेकर याला इंदुरातून अटक केलं.  

डॉ. बांदिवडेकर यांच्यावर महाराष्ट्रात आणि कर्नाटकात विविध गुन्हे दाखल आहे. कोल्हापुरात त्यांच्यावर खुनाचे तीन गुन्हे, खुनाचा प्रयत्न करणे, फसवणूक करणे, खंडणी आणि धमकावणे असे गुन्हा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समोर आले. तसेच बांदिवडेकर यांच्यावर कोल्हापूर आणि बेळगावात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. 
 
 
Edited By- Priya Dixit