संबंधित माहिती
- WhatsApp :आता व्हॉट्सअॅपवर स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत, नवीन सुरक्षा फीचर जारी
- खडसेंना 3 तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाह यांनी भेट नाकारली
- गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर आरएसएसच्या 5 नेत्यांना Y श्रेणीची सुरक्षा
- Z+ grade security आता मुकेश अंबानी यांना Z+ श्रेणीची सुरक्षा दिली जाणार आहे
- कुपवाडामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले, एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त
खडसे यांना देण्यात आलेली ‘वाय’दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली
आमदार एकनाथ खडसे यांना देण्यात आलेली वायदर्जाची सुरक्षा शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास काढून घेण्यात आली आहे. दूध संघातील चोरी प्रकरणात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी खडसे यांनी गुरुवारी सायंकाळपासून पोलीस स्टेशन आवारात आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे ३ वाजता शिंदे सरकारने खडसेंना दणका देत, त्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला.
आंदोलन केले म्हणून...
मला १९९१ पासून वायदर्जाचे संरक्षण देण्यात आले होते. त्यात कमीअधिक प्रमाणात वाढ किंवा घट झाली. मात्र, ३१ वर्षांनंतर मला दिलेली सुरक्षा राज्य शासनाने काढून घेतली. राज्य शासनाविरोधात आंदोलन केल्यामुळेच ही सुरक्षा काढण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor
Edited by : Ratnadeep Ranshoor
