सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (15:05 IST)

खडसेंना 3 तास ऑफिसबाहेर बसवून अमित शाह यांनी भेट नाकारली

girish mahajan
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे  त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत अमित शाह  यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून शाह यांनी भेट नाकारली होती, असा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
 
गिरीश महाजन म्हणाले, काही दिवसांपूर्वी खडसे स्वगृही परतणार असल्याची चर्चा होती. दरम्यानच्या काळात खडसे सूनबाई रक्षा खडसे यांच्यासह दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते. अमित शाह यांच्या ऑफिसबाहेर हे दोघेही तीन तास बसून होते. पण त्यांना शाह यांनी भेटीची वेळ दिली नाही. त्यावेळी रक्षा खडसे यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तीन तास ऑफिसबाहेर बसून आहोत, पण शाह यांनी भेट नाकारली. त्यानंतर खडसे यांनी फोनवर अमित शाह यांच्यासोबत बोलणं झाल्याचं म्हटलं होतं.

Edited by : Ratnadeep Ranshoor