शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (07:53 IST)

गणेश नाईक यांचे खळबळजनक वक्तव्य

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपात गेलेल्या नाईक गटाचे नगरसेवक फोडल्याने गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागले आहे. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 
 
इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही, असे नाईक म्हणाले. यावर शिवसेनेने देखील लगेचच प्रत्यूत्तर दिले असून गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत, असे शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटले आहे. यावरून नवी मुंबईतील पालिका निवडणूक किती चुरशीची होणार आहे हे दिसू लागले आहे. 
 
तुर्भेमधील भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असे गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.