गौतमी पाटीलची 'पाटलांचा बैलगाडा' गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी
लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. ती जिथे कार्यक्रमाला जाते नवीन गोंधळ होतो. त्यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तिच्या बरोबरीने डान्स करून एका तरुणाने चक्क जुगलबंदी केली आहे. शिर्डी मध्ये गौतमीचा डान्सचा कार्यक्रम होता. नेहमी प्रमाणे गौतमीच्या डान्सला बघण्यासाठी गर्दी लोटली होती. तिच्या डान्स बरोबर तरुण देखील डोलायला लागतात. असाच एका तरुणाने चक्क गौतमीच्या सोबत डान्स करून गौतमी सारखे स्टेप्स करून जुगलबंदी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गौतमीचा शिर्डी येथे डान्सचा कार्यक्रम असताना गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नृत्य करत असताना तिने जशी स्टेप्स केल्या आहेत तशी स्टेप्स घेऊन हा तरुण मंचाचा खाली डान्स करत आहे. या दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना आवडले असून ते या जुगलबंदीचा आनंद घेत आहे.
Edited By- Priya Dixit