रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2019 (17:36 IST)

शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथील यार्डात थांबलेल्या शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात बुधवारी सकाळी जिलेटीनच्या पाच कांड्या सापडल्याने खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर रिकामा केला आणि बॉम्बशोधक पथकाला बोलावण्यात आले. जिलेटीनच्या कांड्या असलेल्या बॅगसोबत एक पत्रही सापडले असून ‘आपण काय करु शकतो हे भाजपा सरकारला दाखवायचे आहे’, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
 
शालिमार येथून लोकमान्य टिळक टर्मिनसला (एलटीटी) येणारी शालिमार एक्स्प्रेस बुधवारी सकाळी एलटीटी स्थानकात पोहोचली. यानंतर एक्स्प्रेस साफसफाईसाठी यार्डात नेण्यात आली. डब्यांमधील साफसफाईचे काम सुरु असताना कर्मचाऱ्यांना एका बॅगेत जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्या. कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी घेत जिलेटिनच्या कांड्या जप्त केल्या. दुसरीकडे बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले.