पत्रकाराची घरात घुसुन चाक़ूने गळा चिरुन हत्या
मुंबईत राहात असलेल्या पत्रकाराची घरात घुसुन चाक़ूने गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री सदरची घटना घडली आहे. आनंद नारायण ( ३८) असे मृत पत्रकाराचे नाव असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून अँटॉप हिल पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका वृत्तवाहिनीमध्ये पत्रकार असलेले नारायण हे अँटॉप हिलमधील पँटा गॅलक्सी इमारतीतील सातव्या माजल्यावरील फ्लॅटमध्ये राहात होते. मे महिन्याच्या सुट्टीमुळे कुटुंब गावी गेल्याने एकटया राहात असलेल्या नारायण याच्या घरी सोमवारी रात्री अडीजच्या सुमारास आलेल्या आरोपीने त्यांची चाक़ूने गळा चिरुन हत्या केली.नारायण यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट होउ शकले नाही.