1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Get up Devendraji the police car has stopped

"उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली...."; सुषमा अंधारे यांचा फडणवीसांना टोला

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सत्ताधारी शिंदे गट व भाजपा यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटावर त्यांनी त्यांच्या सभांमधूनही परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. पण त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सातत्याने भूमिका मांडली आहे.
 
या पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी यासंबंधी व्हिडिओ ट्विट करून गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत पोलिसांची गाडी निर्जन स्थळी थांबलेली व त्यातील कैद्यांना कोणती तरी पाकिटे दिली जात असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
 
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड असे त्या म्हणाल्या.
पुढील लेख
९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील