शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (10:31 IST)

धक्कादायक : टोमॅटो चटणीच्या गरम भांड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

मुंबईतील अंबरनाथमध्ये टोमॅटोच्या चटणीच्या गरम भांड्यात पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.  तनुष्का रामास्वामी असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. तनुष्काचे वडील रामास्वामी हे इडली सांबर विक्रते आहेत. 

दररोजच्या सवयीनं रामास्वामी यांनी मंगळवारी सकाळी साडे पाच वाजता इडली-सांबरसाठी लागणारी टोमॅटोची चटणी तयार करून एका टोपात भरून ठेवली होती. आईजवळ झोपलेल्या तनुष्काचे डोळे उघडल्यानंतर खेळता खेळता ती गरम चटणीच्या टोपापाशी जाऊन पोहचली... आणि तोल जाऊन ती गरम चटणीच्या टोपात पडली. या घटनेत तनुष्का ८० टक्के भाजली. अत्यंत गंभीर अवस्थेत तनुष्काला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारा दरम्यान तनुष्काचा मृत्यू झाला.