सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (23:12 IST)

मुलीच्या भावाने केली प्रियकर तरुणाची हत्या

अल्पवयीन बहिणीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्याचा रागात मनात ठेवत तरुणाची हत्या झाल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील कुऱ्हा पोलिस स्टेशन अंतर्गत आमला विश्वेश्वर येथे 26 ऑगस्टच्या रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हत्येप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक केली.
 
अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदूरे (22) खडकपुरा, चांदूर रेल्वे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षयचे चांदुर रेल्वे तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या प्रेमप्रकरणात अल्पवयीन मुलगी पुरती फसली होती. तीअक्षयच्या नादी लागली होती. ती त्याच्या बोलण्यावर भाळली व तीने त्याच्यासोबत पलायन केले. पोलिसांनी दोघा प्रेमीजणांना पकडण्यात यश मिळवले  होते. मात्र आम्ही आमच्या मर्जीने गेल्याचे दोघांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले. मात्र मुलगी अल्पवयीन असल्यामुळे अक्षयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अक्षयची हत्या झाली त्या दिवशी तो आमला विश्वेश्वर येथे आला होता. तो मुलीच्या भावाच्या नजरेस पडताच त्याचा राग उफाळून आला. मुलीच्या भावाने संतापात त्याच्या दोघा अल्पवयीन मित्रांच्या मदतीने अक्षयला बेदम मारहाण केली. अक्षयला भिवापूर रस्त्यावर दुचाकीने नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने सपासप वार करण्यात आले. त्यानंतर देखील गावात नेऊन भर चौकात मारहाण केली. या मारहाणीत अक्षय जखमी झाला. जखमी अक्षयला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारार्थ त्याला नागपूर येथे रवाना करण्यात आले. मात्र रस्त्यातच त्याचा जिव गेला.