शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (16:08 IST)

खडसेंच्या अडचणीत वाढ, ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.कारण,काल ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर आता ईडी येत्या आठवड्यात चार्जशीट दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चार्जशीच दाखल करण्यात येणार आहे.
 
काल ईडीने  खडसे यांची सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्याचप्रमाणे एक बँक खाते गोठवलं. त्यात 86 लाख रुपये आहेत. मनी लाँडरिंग कायद्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. एकनाथ खडसेंविरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे.ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी एकनाथ खडसे यांची पाच कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.
 
त्यानंतर आता एकनाथ खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.कारण,ईडी चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे.येत्या आठवड्यात ईडी चार्जशीट दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चार्जशीच दाखल करण्यात येणार आहे.