1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (23:10 IST)

नाशिक: कमी दरात चहा, पाववडा विकतो म्हणून तरुणाचा खून

Nashik: Murder of a youth for selling tea and pavwada at low prices
चहा टपरीजवळ दुसरी चहाची टपरी लावल्यातून आणि कमी दरात चहा व पाववडा विकतो, अशी बदनामी केल्याच्या संशयावरुन एकाने टपरीचालकावर चा’कूह’ल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात टपरीचालकाचा मृत्यू झाला आहे.
 
ही घटना  आरटीओ कॉर्नर – रासबिहारी लिंक रोडवर घडली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तुषार काळे (वय ३६ रा. कळसकर नगर , आरटीवो कॉर्नर, रासबिहारी लिंक रोड, नाशिक) असे मृ’त्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आकाश काळे असे ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराचे नाव आहे.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, काळे याच्या चहा टपरीजवळ संशयित आकाश काळेने चहा टपरी सुरु केली. त्यातून दोघांमध्ये वाद सुरु झाले. सायंकाळी ५ वाजेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. कमी दरात चहा व पाववडा विकतो, अशी बदनामी का करतो अशी विचारणा संशयित आकाशने तुषारला केली.
 
त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने आकाशने तुषारच्या डाव्या पायाच्या मांडीवर चा’कूह’ल्ला केला. त्यानंतर आकाश पळून गेला. तुषार गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला. ही बाब पोलिसांना समजताच  म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक गणेश रेहरे, पोलीस शिपाई दिनेश गुंबाडे, बलदेव राठोड यांनी संशयित आकाश यास राहत्या घराजवळ ताब्यात घेतले.