गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:03 IST)

साडेचार कोटी रुपयांचे सोने फेकले विहरीत

हो असा प्रकार समोर आला आहे नाशिक मध्ये. पिंपळगाव बसवंत येथे एका सोनाराच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली होती. मग चोरी केली आणि सोबत सीसीटीव्ही सुद्धा पळवले होते. मात्र कोणाला शंका येवू नये म्हणून एका शेतातील विहरीत पंधरा किलो सोने त्यांनी लपवण्यासाठी टाकून दिले होते. पोलिसांनी इकडे तपास सुरु केला, दुकानातील चोरी कशी झाले हे तपासले. नंतर त्यांनी याठिकाणी असलेल्या सर्व लोकांची तपासणी केली त्यात दुकानातील एक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेला होता. पोलिसांनी तपास केला. आधीच पुरावे कमी त्यात चोरी झाले तेव्हाचे सर्व सीसी टीव्ही फुटेज चोर घेवून पळाले होते. मात्र पोलिसांनी अखेर छडा लावला आणि हे सर्व चोर पकडले गेले. त्यांनी हे साडेचार कोटी रुपयांचे सोने विहरीत फेकले होते. मग पोलिसांनी विहरीत उतरायला पाणबुड्या बोलवला आणि सर्व सोने बाहेर काढले आहे.

काय आहे प्रकरण :

पिपळगाव बसवंत येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्रीअज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले होते. हे सोने सुमारे किंमत सुमारे चार कोटी रुपये  आहे.  मुंबई - आग्रा महामार्गावर अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स हे शोरूम आहे सदर दुकान हे दुमजली असूनवरील मजल्यावर मालक स्वत: राहतात.  गुरुवारी रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला व लॉकर बनावट चावीने उघडले. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन गेला होता.