सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (00:10 IST)

गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्यांची घोषणा

train
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशलच्या ७४ फेऱ्या जाहीर केल्या असतानाच मध्यरेल्वेने आणखी ३२ गणपती स्पेशल फेऱ्यांची घोषणा केली आहे. शुक्रवारपासून आरक्षणही खुले झाले आहे. या स्पेशल गाड्या १३ ऑगस्टपासून धावणार आहेत. या अतिरिक्त गाड्यांमुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांना गाव गाठणे सुलभ होणार आहे.
 
गणेशोत्सवात धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच फुल्ल होताच रेल्वे पशासनाने ५ गणपती स्पेशलच्या ७४ फेऱ्या जाहीर करून आरक्षण खुले केले होते. काही तासातच या गाड्यांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने गणपती स्पेशलच्या आणखी ३२ फेऱ्या जाहीर करत दिलासा दिला आहे. सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी, नागपूर-मडगाव, पुणे-कुडाळ, पुणे-थिविम, पनवेल-कुडाळ स्पेशल गाड्यांचा यात समावेश आहे.