कोल्हापूर – ज्येष्ठ विचारवंत गोवेंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व नऊ संशयितांना न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच दोषारोप निश्चिती होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचा १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी गोळया झाडून खून करण्यात आला. राजारामपुरी पोलीस ठाण्यात...