शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (14:52 IST)

अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी ग्रामपंचायतीने घेतला ‘हा’ निर्णय

नाशिक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर यापुढे सुधारित दरडोई दोन रुपयांऐवजी पाच रुपये कर आकारला जाणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायती तर्फे घेण्यात आला आहे.
 
गडावर येणाऱ्या भाविकांना नागरी सुविधा पुरवताना ग्रामपंचायतीला आर्थिक मर्यादा येत असून उत्पन्नाचा स्रोत म्हणून भाविकांच्या वाहनांवर व भाविकांवर कर आकारण्याची मुभा मिळावी, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाली होती. याविषयी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेशकर दरडोई पाच रुपये कर आकारणी मंजुरी दिली आहे. त्यानुसार व ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाई नुसार करतांनी बाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत.

गडावर देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ग्रामपंचायतीकडून नागरी मूलभूत सुविधा देताना वार्षिक उत्पन्न तुटपुंजे असल्याने अडचणी येतात. शासनाकडून मिळणारा निधी अत्यल्प आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून भाविकांना नागरी सुविधा देताना अल्प उत्पन्न आणि कमी उत्पन्न यामुळे सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीची आर्थिक ओढाताण होत असल्याने भाविकांकडून दरडोई पाच रुपये घेण्याचे ठरवले आहे.
 
विशेष म्हणजे सदरचा कर हा खासगी वाहनातून येणाऱ्या वाहनातील प्रत्येक प्रौढ यात्रेकरू यांच्याकडून दरडोई पाच रुपये आकारण्यात येणार आहे. कर दिल्यानंतर प्रत्येक यात्रेकरूस पावती देण्यास बंधनकारक राहणार आहे.