Hand rickshaw drivers strike माथेरानमध्ये ई रिक्षासाठी हातरिक्षा चालकांचा बंद
Hand rickshaw drivers strike माथेरानमध्ये गेली 12 वर्षे इ रिक्षा सुरु व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणार्या श्रमिक रिक्षा संघटनेने हा अहवाल सादर होत नाही याचा निषेध करण्यासाठी 16 ऑक्टोबर पासून हातरिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन दिवस हा बंद राहणार असून त्या काळात शासनाने ई रिक्षा बाबत निर्णय घेतला नाही तर 19 ऑक्टोबर पासून ई रिक्षासाठी हातरिक्षा चालक आणि श्रमिक रिक्षा संघटना उपोषणाला बसणार आहे.
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने ई-रिक्षाची चाचणी तीन महिन्यात पूर्ण केल्यानंतर तिचा अहवाल सनियंत्रण समितीने सर्वोच्च न्यायालयात सादर केला नसल्याने माथेरान श्रमिक हातरीक्षा संघटनेकडून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अहवाल जर चार दिवसात सादर न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे.
सोमवारी दिवसभरात माथेरानमधील परवानाधारक 94 हातरिक्षा पैकी एकही हातरिक्षा रस्त्यावर आली नाही. त्यामुळे काही प्रमाणात वृद्ध पर्यटक यांचे हातरिक्षा उपलब्ध नसल्याने हाल झाले.