गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (10:50 IST)

फळांचा राजा आंबा अर्थात हाफुस बाजारात दाखल

आंबा प्रेमिसाठी मोठी बातमी आहे.  फळांचा राजा असलेला आंबा त्यातही सर्वात आवडता प्रकार   हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. खरे तर अनेकदा हाफुस हा जानेवारीत बाजारात  येतो त्यामुळे भाव सुद्धा वाढलेलं असतात मात्र यावेळी दोन महिने लवकर आंबा दाखल झाला आहे. नोव्हेंबरमध्येच पेटी आल्यानं शेतकरी आणि व्यापारीवर्गात आणि ग्राहक खुश झाले आहेत. पाऊस उत्तम आणि आंबा पिकासाठी कोकणातील हवामान  पोषक ठरले  आहे. यामध्ये प्रथम मान मिळवत  सिंधुदुर्गमधील देवगडचे शेतकरी  प्रकाश शिरसेकर यांनी हापूस आंबा पाठवला आहे. हा आंबा बाजारत दाखल होताच त्याला पेटीला  नऊ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. बाजारत दाखल झालेल्या पहिल्या पेटीची मुंबई येथील  व्यापाऱ्यानं  पूजा केली आहे. लवकर आंबा आल्याने आवक चागली राहील आणि जरा जास्त काळ हा आंबा खाता येणार आहे.