शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

'एअरटेल पेमेंट बँके' त गॅस सिलिंडरची सबसिडी जमा होणार नाही

airtel gas subsidy

केंद्र सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी गॅस सिलिंडरवरील सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एअरटेल पेमेंट बँकेच्या खातेधारकांच्या अकाऊंटवर एलपीजी सबसिडी ट्रान्सफर न करण्याचं म्हटलं आहे.एअरटेल एक टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी आहे, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ग्राहकांना पेमेंट बँकेची सुविधा देत आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलयं की, ज्या ग्राहकांचं अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे आणि त्यांनी आधारसोबत लिंक केलं आहे तर त्यांच्या बँक खात्यात सबसिडी ट्रान्सफर केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत एलपीजी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनुसार, घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी त्यांच्या खात्यात जमा होत नाहीये. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, अशा प्रकारच्या तक्रारी अशा ग्राहकांकडून आल्या आहेत ज्यांचं बँक अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे.