बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले

केंदीय मंत्रिमंडळाने सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले आहेत. देशभरात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये तूर, मूग आणि उडीद निर्यातीवरचे निर्बंध हटवले होते.  जवळपास सात वर्षांनंतर निर्यातीची परवानगी मिळाली आहे.
 
आपल्या देशाची गरज अंदाजे २ कोटी २० लाख टन डाळ इतकी आहे, गेले काही वर्ष आपलं उत्पादन १ कोटी ८० लाख ते १ कोटी ९० लाख टन या दरम्यान रेंगाळतंय. मात्र यंदा 2 कोटी 30 लाख टन डाळ उत्पादनातून मिळणार आहे. आपला देश डाळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर, डाळ खाण्यात पहिल्या क्रमांकावर आणि डाळ आयात करण्यातही आपला देश पहिल्या क्रमांकावर आहे.