मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या उपायाने मंदिरात न जाताही मिळेल पुण्य

आपण हे तर ऐकले असेल की दररोज मंदिरात जाण्याने किंवा पूजा पाठ केल्याने अनेक फायदे आहेत. धार्मिक स्थळावर गेल्याने आपल्या मनाला शांती मिळते आणि शरीरावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. परंतू अनेकदा कामाच्या दबावामुळे किंवा इतर काही कारणांमुळे मंदिरात जाणे शक्य होत नाही. त्यासाठी आम्ही एक असा उपाय सांगत आहोत ज्याने तेवढेच पुण्य लाभेल जेवढं मंदिरात जाऊन पूजा केल्याने लाभतं.
शिखर किंवा घुमट दर्शन
शास्त्रांप्रमाणे मंदिराचे शिखर तेवढेच महत्त्वाचे आहे जितकं की मंदिर. आपण शिखरावर झेंडा फडफडताना बघितला असेल. हे मंदिरातील एक पवित्र स्थळ आहे. म्हणून यात्रा करताना दुरून मंदिर दिसल्यास आपण त्याच्या शिखर किंवा घुमट आणि झेंडा बघा, आपले डोळे काही सेकंदासाठी बंद करा आणि इष्ट दैवतांचे ध्यान करा.
 
शास्त्रांमध्ये उल्लेख आहे की शिखर दर्शनम पाप नाशम अर्थात मंदिराचे घुमट बघण्याने पाप नष्ट होतात.
 
म्हणूनच मंदिरात घुमट उंच निर्मित केलं जातं ज्याने ते लांबूनही सर्वांना दिसावे आणि काही कारणांमुळे आपण मंदिरात जाऊ शकत नसाल तर दुरून त्याचे श्रद्धापूर्वक दर्शन पुण्य कमावावे.