Dharma Sangrah

MPSC paper leak case महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Updated: बुधवार, 29 जुलै 2026 (19:25 IST)
ALSO READ: विरोधी पक्षांच्या गदारोळात लोकसभेत अँटी पेपर लीक बिल मंजूर
आता अभिमन्यू पवार यांनी हे आरोप “निराधार, हास्यास्पद आणि राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे सांगत तक्रार दाखल केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार MPSC कथित पेपरफुटी प्रकरणात सोशल मीडियावर खोटी आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. 
 
माहितीनुसार सपकाळ यांनी याआधी असे म्हटले होते की, MPSC ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरत होता आणि मूल्यांकन प्रक्रियेतही अनियमितता आहे. त्यांनी सरकार आणि यंत्रणांवर मौन बाळगल्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणामुळे राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे. सपकाळ यांनी यापूर्वीही NEET, TET आणि आता MPSC पेपरफुटीबाबत सरकारवर टीका केली होती. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी विचारले होते, "MPSC पेपरफुटीचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत का?" तसेच, या प्रकरणाचे धागेदोरे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त केला होता. 
ALSO READ: राहुल गांधींच्या आरोपांमुळे लोकसभेत गदारोळ, अमित शाह यांच्यावर विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप, सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेणार
आता आमदार अभिमन्यू पवार यांनी हे आरोप पूर्णपणे हास्यास्पद, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना आपली जाहीर बदनामी केल्याचा आक्षेप घेत त्यांनी पोलिसांत धाव घेतली. अशी माहिती समोर आली आहे. 
ALSO READ: नीट आंदोलकांना दिलासा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून एफआयआर मागे घेण्याचे आदेश
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

LIVE: मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली

मुंबईतील चेंबूरमध्ये सहा मांजरे ठार केल्याप्रकरणी आरोपीला अटक

इंडोनेशियामध्ये 240 लोकांना घेऊन जाणारे जहाज उलटले, 130 प्रवासी बेपत्ता आणि सहा जणांचा मृत्यू

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत मुसळधार पाऊसाची हजेरी

पुढील लेख
Show comments