सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (20:47 IST)

मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो तुम्ही ताई? चित्रा वाघ यांनी निशाणा साधला

chitra wagh
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. "गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का? असा संतप्त सवाल विचारला आहे.
 
भाजपाने आता सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो तुम्ही ताई?, 11 नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"राज्याच्या “मोठ्ठ्या ताई” 2 दिवसापासून राज्यसरकारवर टीवटीव करतांना दिसताहेत.. कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला … @supriya_sule झालेली घटना दुदैवी आणि वाईटचं यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाहीच याबाबत आपण निश्चींत रहा…राज्यातील प्रत्येकाचा जीव आमच्या साठी महत्वाचा आणि राज्यसरकार मजबुतीने ठाम पणे पिडीत परिवाराच्या सोबत उभं आहे शिवाय पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी ही उपाययोजना केली जाईल."
 
"मविआ काळात घडलेलं भंडारा अग्नीकांड विसरलात का हो तुम्ही ताई? 11 नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला? त्या तुमच्या मविआ काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अग्नीकांड झाले ज्यात कित्येक माणसं दगावलीत. तरी ही त्यावेळच्या तुमच्या पक्षाच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई? तिथं ना स्मोक डिटेक्टर बसवले होते, ना अग्निरोधक यंत्रणा. तेव्हा तोंडदेखली मलमपट्टी म्हणून तुम्ही राज्यातल्या सगळ्याचं हॉस्पिटल चे ऑडीट करण्याचे आदेश दिले पण, तुमच्या इतर आश्वासनांसारखं ऑडिटही हवेतच विरून गेलं."


Edited By - Ratnadeep Ranshoor