शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)

पोलीस उपनिरिक्षक होण्याचे हवलदारांचे स्वप्न पूर्ण

राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 
 
बढतीची दीर्घ प्रतीक्षा संपली आता 
वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरिक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत सुमारे 45 हजार हवालदार, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक यांना होणार आहे. या निर्णयामुळे आता पोलीस शिपायांना त्यांच्या सरासरी 35 वर्षांच्या सेवाकलावधीमध्ये पोलीस उपनिरिक्षक या अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त होता येईल. पोलीस शिपायांना सर्वसाधारण 12 ते 15 वर्षानंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होवून त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो.