सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (20:35 IST)

आई-वडिलांनी मोबाईल हट्ट पुरवला नाही म्हणून आत्महत्या केली

suicide
नाशिकच्या सातपूर परिसरातील अक्षय खेताडे या २३ वर्षीय तरुणाच्या मृत्यू प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अक्षय खेताडे याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून आत्महत्येच्या धक्कादायक कारणाचा खुलासा देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे. आई-वडिलांनी मोबाईल हट्ट पुरवला नाही त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
 
नवीन मोबाइल घ्यायचा असल्याने अक्षयने आपल्या पालकांकडे पैशाची मागणी केली. मात्र मुलाला मद्याची नशा करण्याची सवय होती. त्यामुळे आई-वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्याचाच राग धरून अक्षयने आई-वडील घरात झोपल्याचे लक्षात येताच बाहेरून घराचा दरवाजा लावला आणि पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. 

Edited by- Ratnadeep Ranshoor